भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

Published by :

गुजरात विधानसभा निवडणूक एक वर्षावर असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाने गुजरातच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे मी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे, असे रुपाणी यांनी स्पष्ट केले आहे.

गुजरातमध्ये पडद्यामागे नेतृत्व बदलण्याची तयारी सुरू होती,पण भाजपा विजय रुपाणी यांना इतक्या लवकर मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय घेईल याची कल्पना कोणालाही नव्हती. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुजरात कोणाच्या हातात असेल याबाबत निर्णय आज घेण्यात येणार आला. या बैठकी दरम्यान भाजपाचे भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री असतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

कोण आहेत भूपेंद्र पटेल?
भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यासोबतच अहमदाबाद महानगर पालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांच्यानंतर कोण येणार? या चर्चेमध्ये कुठेही भूपेंद्र पटेल यांचं नाव नव्हतं. त्यामुळे विजय रुपाणी यांनी ज्या प्रकारे अचानकपणे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तितक्याच अचानकपणे भूपेंद्र पटेल यांचं देखील नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊन जिंकलं देखील आहे!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com