Deepak Sawant
Deepak SawantTeam Lokshahi

मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात

माजी आरोग्यमंत्री जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले

मुंबई : माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दीपक सावंत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. घोडबंदर रोडवर दिल्ली दरबार हॉटेल जवळ ही घटना घडली.

Deepak Sawant
सत्यजीत तांबे भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर?

माहितीनुसार, दीपक सावंत हे आज सकाळी पालघर येथे जाण्यासाठी निघाले होते. याचवेळी घोडबंदर रोडवरील दिल्ली दरबार हॉटेलजवळ सिग्नल जवळ त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. या अपघातामध्ये सावंत जखमी झाले आहेत. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी अंधेरीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती काशीमीरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरु आहे. प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने उडवले. तर, त्याआधी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारचा देखील अपघात झाला होता. आणि आता आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com