मोठी बातमी; उद्धव ठाकरेंना साथ देऊया, मनसेच्या बैठकीत सूर
लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज मनसेच्या नेत्यांची बैठक राज ठाकरेंनी बोलावली होती. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत राज ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे.
एकीकडे बॅनर झळकत आहेत की, राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं आणि बैठकीतसुद्धा तसाच सूर उमटला आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. मनसेच्या बैठकीत काही नेत्यांनी हा प्रस्ताव दिला आहे. राज ठाकरेंकडून मात्र या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली नाही आहे.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटला. याआधी 2017 च्या महापालिका असो किंवा त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका त्यावेळीही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली होती. या बैठकीत उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया, असा सूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीत उमटला आहे.