मोठी बातमी: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यात बैठक सुरु

मोठी बातमी: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यात बैठक सुरु

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा
Published by :
Siddhi Naringrekar

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या विलीनीकरण्यासाठी राज्यातील शरद पवार गटातील अनेक दिग्गज कार्यकर्ते यांची पुण्यातील मोदी बागेत बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. बैठकीत शरद पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आजच्या या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील,खासदार सुप्रिया सुळे,खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे अशोक पवार आमदार शशिकांत शिंदे अनिल देशमुख उपस्थित आहे.सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी वर चर्चा होत आहे.तसेच पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर ही पहिलीच बैठक असल्याने अजून काही नवीन पर्याय वर चर्चा होण्याची शक्यता काही महत्त्वाची घडामोडी वर निर्णय या बैठकीतून होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com