राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा!

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली.
Published by :
Dhanshree Shintre

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तुतारी चिन्ह वापरता येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळू नये, यासाठी प्रयत्न केले गेले होते. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटात पक्ष विभागला गेला आहे. या दोन्ही गटांची कायदेशीर लढाईदेखील निवडणूक आयोगात पार पडली. परंतु अजित पवार गटाला फटकारत शरद पवार गटाला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होईपर्यंत तुतारी चिन्ह देण्यात यावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला तुतारी आणि अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह दिल्यास ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुर्तास अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह देऊ नये, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली होती. त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीच्या वादावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार यांच्या गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निडणुकीत तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा!
Pradeep Sharma: मोठी बातमी! एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com