अजित पवारांकडून परतलेल्या 'या' नेत्याला मोठी जबाबदारी

अजित पवारांकडून परतलेल्या 'या' नेत्याला मोठी जबाबदारी

अजित पवारांनी शपथविधी सोहळ्याने राज्यात सत्तासंघर्षाचा दुसरा अंक पाहिला मिळाला. परंतु, शपथविधीनंतर काही तासांतच अजित पवारांच्या गटातून काही नेते पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील झाले.

मुंबई : अजित पवारांनी शपथविधी सोहळ्याने राज्यात सत्तासंघर्षाचा दुसरा अंक पाहिला मिळाला. परंतु, शपथविधीनंतर काही तासांतच अजित पवारांच्या गटातून काही नेते पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील झाले. यातीलच अमोल कोल्हे यांना आता राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित पवारांकडून परतलेल्या 'या' नेत्याला मोठी जबाबदारी
अजित पवार गटाला अर्थ खात्यासह मिळणार 'ही' खाती? यादी चर्चेत

राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर शपथविधी सोहळ्यात अमोल कोल्हे यांची उपस्थिती होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी अमोल कोल्हेंनी शरद पवारांना पाठिंबा दिला असून राज्यभरात सभा घेत अजित पवार गटावर टीकेची तोफ डागली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात अमोल कोल्हे यांना तुम्ही पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा, असे म्हंटले होते. यामुळे कोल्हे यांच्यावर प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा आणि विधासभेच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी कोल्हे यांना देण्यात आली आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली. माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल शरद पवार साहेब, महासंसदरत्न खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो! आपण सर्वांनी दाखविलेला हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com