वर्ध्यात भाजपातील मुंगरीलालांंना आमदारकीचे हसीन सपने!
भूपेश बारंगे | वर्धा : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील विधानसभेची निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपली आहे.जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी अनेक मुंगरीलालांनी आर्वी मतदारसंघात पाऊल रोवून आमदार होण्याचे स्वप्न पाहायला सुरुवात केली आहे. भाजप पक्षात सर्वात जास्त चढाओढ दिसत असल्याने आर्वी मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे. सध्या आर्वी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार दादाराव केचे करत आहे.
आमदार दादाराव केचे यांनी भाजप पक्षाचे जिल्ह्यात आर्वी विधानसभा मतदारसंघात सर्वप्रथम कमळ फुलवल होत हे मात्र तितकंच खरं! आर्वी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं होत. त्याला खिंडार पाडत दादाराव केचे हे सन 2009 मध्ये काँग्रेसचे आमदार अमर काळे यांना पराभूत करून आमदार दादाराव केचे यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर सन 2014 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.
सन 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप पक्षात उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. त्यावेळी भाजपचे दादाराव केचे यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार नसल्याने भाजपच्या केंद्रातील मोठ्या नेत्याच्या जवळीक असलेल्या नेत्यांनी आर्वी, आष्टी, कारंजा या तालुक्यात अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून मलाच या मतदारसंघाची उमेदवारी मिळेल, अशी आशा अनेकांजवळ मांडली होती. मात्र भाजप पक्षाची उमेदवारी मिळवताना मात्र 'दिवे' हवेत विझले गेले. त्यानंतर या मतदारसंघात कधीही 'दिवे'चा प्रकाश पडला नाही. याच आर्वी मतदारसंघात भाजपची दादाराव केचे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यावेळी ते 13 हजारापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता.
तोच प्रकार आता पुन्हा या आर्वी मतदारसंघात पाहायला मिळत आहे. अनेक हवसेगवसे मतदारसंघात लुडबुड करताना दिसत आहे.त्यातच भाजपचे पदाधिकारी त्यांना भेटून निवेदनांचा पाऊस पाडत असल्याचं दिसत आहे.तीनही तालुक्यात कधी न दिसलेले आता शनिवार रविवारी भेटीगाठी घेताना दिसत आहे.जणूकाही 'गुळा'ला माशा लागतात अशी परिस्थिती यावेळी बघायला मिळतात. अनेक भाजपातील हवसेगवसे त्यांची भेट घेताना फोटोशन केले जात आहे.
आर्वी मतदारसंघात भाजपकडून कुणबी,तेली आणि भोयर,पवार समाजातील काही नेते आमदार होण्यासाठी भाजपातच उमेदवारी मिळवण्यासाठी ढवळाढवळ करताना दिसत आहे. भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी रात्रदिवस मेहनत करणाऱ्या नेत्यांना डावलून आपली पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रकार केला जात असल्याने कॉंग्रेस पक्षाच्या मनात मात्र गुदगुदी होत आहे. आमदार दादाराव केचे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसची चांगलीच दमछाक होईल यासाठी इतरांना जर उमेदवारी गेली तर आपल्याला आमदार होण्याचा मार्ग मोकळा होणार, अशी काँग्रेसच्या गोट्यात चर्चा आहे.
भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध असल्याने या मतदारसंघात आम्हाला विधानसभेची तिकीट मिळणार असल्याचे दर्शवून सध्या अनेक गावांत वेगवेगळे कार्यक्रम घेताना दिसत आहे. त्यामुळे मतदारसंघातील मतदार पेचात पडत आहे. गलोगल्ली, पानटपरी, चौकाचौकात कोणाला भाजपची तिकीट मिळणार यावर जिकडे-तिकडे चर्चा होत आहे. ज्यांनी कमळ फुलवल त्यांना हा धक्का म्हणावं लागेल? त्यांचे कार्यकर्ते नेता नसलेल्याच्या मागे फिरत आहे. कारंजात महामार्गवर एका हॉटेलमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी चक्क एका महिला माजी पदाधिकाऱ्याचे पतीदेवच फोटो काढत असताना एक दृश्य मध्ये दिसून येत आहे. आर्वी मतदारसंघात कितीही आले तरी या मतदारसंघात काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपचे आमदार दादाराव केचे शिवाय पर्याय नाही असे मतदार बोलत आहे. आर्वी मतदारसंघात भाजपची उमेदवारी कोणाच्या गळ्यात माळ पडणार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे.त्यामुळे भाजप पक्षाचा आमदार होण्याचे मुंगरीलालांचे स्वप्न पूर्ण होतील का? की ते भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्या प्रचारात फिरताना दिसणार!
पक्षाच्या बैठकीला दांडी हॉटेलच्या आढाव्यात उपस्थिती
पुलगाव येथे भाजप पक्षाची जिल्हा कार्यकारणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पक्षाचे नेते आगामी निवडणूक दृष्टीकोनातून बैठक घेण्यात आली होती. मात्र त्याठिकाणी पक्षाच्या आमंत्रित नेत्यांनीच बैठकीला दांडी मारून कारंजा येथील एका हॉटेलमधीलआढाव्यात उपस्थित होते. त्यांच्यावर भाजप काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.