भाजप देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी पार्टी; फडणवीसांचा दावा

भाजप देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी पार्टी; फडणवीसांचा दावा

नागपूरातील पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत भरत नगर परिसरात भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

कल्पना नलसकर | नागपूर : अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखात भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात महत्त्वाची पार्टी असल्याचं म्हटलं आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप देशातलीच नाही तर जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, असा दावा त्यांनी केला आहे. सगळ्यात जास्त सदस्य असणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. नागपूरातील पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत भरत नगर परिसरात भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

भाजप देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी पार्टी; फडणवीसांचा दावा
सेंद्रिय शेतीकडे पूर्णतः जाणे हा वेडेपणा ठरेल : राजू शेट्टी

नागपुरात भाजपने प्रत्येक बूथ प्रमुखाच्या घरावर पाटी लावण्याचा जो उपक्रम सुरू केला आहे, तो स्तुत्य आहे. याद्वारे भाजपमध्ये खालपासून वरपर्यंत विविध पदांवर असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण भाजपचे आहोत. आपण मोदींच्या नेतृत्वात काम करत आहोत, अशी भावना निर्माण होईल. आणि त्याचा अभिमान असेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. प्रत्येक बूथ प्रमुखाने घरावर भाजपची पाटी लावली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून पश्चिम नागपूर मतदार संघामध्ये भाजप आणखी भक्कम होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखात भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात महत्त्वाची पार्टी असल्याचं म्हटलं आहे. भाजपा सलग तिसऱ्यांदा २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दिशेने जात आहे. आगामी काळात भाजपा देशात स्वत:चं वर्चस्व निर्माण करेल. ज्यांच्या मदतीविना अमेरिका चीनच्या वाढत्या ताकदीला रोखू शकत नाही, असेही अमेरिकेचे प्रमुख नेते वाल्टर रसेल मीड यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com