आदित्य ठाकरेंच्या त्या टीकेला शेलारांकडून जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, ते निर्बृद्धपणे...
राजकीय वर्तुळात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना त्यातच आज ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मेट्रो-6 च्या कारशेडसाठी देण्यात येणाऱ्या जागेवरून राज्य सरकार जोरदार टीकास्र सोडलं. कांजूरमार्ग येथील ४४ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा मेट्रो-६ कारशेडसाठी दिली जाणार आहे. मग, उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी ठेवली का? असा सवाल करत त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली होती. आता आदित्य ठाकरेंच्या याच टीकेला भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.
काय दिले आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर?
मेट्रो-6 च्या कारशेडसाठी देण्यात येणाऱ्या जागेवरून आदित्य ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला उत्तर देतानां शेलार म्हणाले की, 'आदित्य ठाकरे यांच्याकडे अपेक्षा होती की ते अभ्यास करुन बोलतील. पण ते निर्बृद्धपणे बोलले. त्यांचं बोलणं ऐकल्यावर त्यांना प्राथमिक शाळेत पाठवावं लागेल, असं वाटतं. मेट्रो ३ किंवा ६ प्रकल्प असेल कारशेड करा ही भूमिका आदित्य ठाकरेंची, त्यानंतर सौनिक समिती नेमली गेली. त्याचा अहवाल स्पष्टपणे सांगत होता की, मेट्रोचं कारशेड आरेमध्ये करणं सोयीस्कर ठरेल. आरेवर कारशेड करण्याचा खर्च वेगळा आणि इंटिग्रेटेड करायचा खर्च वेगळा आहे. यात शहानपणा कुठून आला?' असा प्रतिप्रश्न करत त्यांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिले.