भाजप नेते हार्दिक पटेल विजयी; कॉंग्रेस आमदाराचा पराभव

भाजप नेते हार्दिक पटेल विजयी; कॉंग्रेस आमदाराचा पराभव

भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरु आहे. विरमगाम मतदारसंघातून बहुचर्चित भाजप उमेदवार हार्दिक पटेल विजयी झाले आहेत

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे कल हातात येत असून भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरु आहे. विरमगाम मतदारसंघातून बहुचर्चित भाजप उमेदवार हार्दिक पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांना एकूण 73786 मते मिळाली.

भाजप नेते हार्दिक पटेल विजयी; कॉंग्रेस आमदाराचा पराभव
पंतप्रधान मोदींच्या विकास मॉडेलवर जनतेच्या विश्वासाचे प्रतीक हा विजय : अमित शहा

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेसचे विद्यमान आमदार लखाभाई भिखाभाई भारवाड यांच्याशी सामना होता. यामुळे ही जागा राज्यातील एक महत्त्वाची जागा बनली होती. आम आदमी पक्षाने येथून अमरसिंह ठाकोर यांना उमेदवारी दिल्याने निवडणूक तिरंगी झाली.

हार्दिक पटेल यांना एकूण 73786 मते मिळाली, तर 'आप'चे अमरसिंह ठाकोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ठाकोर यांना 39,135 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार लखाभाई भिखाभाई भारवाड तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 28,634 मते मिळाली.

भाजप नेते हार्दिक पटेल विजयी; कॉंग्रेस आमदाराचा पराभव
महाराष्ट्रातही भाजपचाच झेंडा फडकेल; रवी राणांचा विश्वास

दरम्यान, विरमगाम हे गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यांतर्गत येते. 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत, विरमगाम विधानसभा मतदारसंघातील एकूण 63.95 टक्के मतदारांनी मतदान केले होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत लखाभाई भिखाभाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या डॉ. तेजश्रीबेन दिलीपकुमार पटेल यांचा 6548 मतांच्या फरकाने पराभव केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com