'पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं' निलेश राणेंची बोचरी टीका
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर त्याच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला आहे. पवार साहेबांशी चर्चा करूनच आम्ही सरकार स्थापन केले, असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी पवार कुटुंबावर बोचरी टीका केली आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर बोलताना निलेश राणे म्हणाले की, पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात दुसरा नाही, पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं आहे. अशी बोचरी टीका केली. आयुष्यभर फक्त टोप्या लावायचं काम पवार कुटुंबाने केलं, मी मागे बोललो होतो फडणवीस साहेब जेव्हा पहाटेच्या शपथविधी बद्दल महाराष्ट्राला सांगतील तेव्हा पवारांना तोंड लपवायला जागा राहणार नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस साहेब सुसंस्कृत आहेत याचा दाखला पवार कुटुंबाने देण्याची गरज नाही ते आहेतच हे महाराष्ट्राला माहित आहे म्हणून अजून पर्यंत पहाटेच्या शपथविधीचा पुरा पिक्चर दाखवला नाही. ज्या दिवशी तो पिक्चर बाहेर पडेल तेव्हा पवार कुटुंबाचे भलतेच वांदे होतील म्हणून गप रहा.असा निशाणा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून साधला.