Chandrashekhar Bawankule | Sambhaji Bhide
Chandrashekhar Bawankule | Sambhaji BhideTeam Lokshahi

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी घेतली संभाजी भिडे यांची भेट

बावनकुळे हे मोटारसायकल वरून भिडे यांच्या घरापर्यत आले. विशेष म्हणजे भिडे आणि बावनकुळे यांच्यामध्ये बंद खोलीत चर्चा झाली.

संजय देसाई|सांगली: आज रविवारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे संघटनात्मक कामानिमित्त सांगली जिल्हा दौरा होते. यावेळी बावनकुळे यांनी सायंकाळी 5.00 वा. सुमारास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या ‘दत्त निवास’ येथे भेट घेतली. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांची सांगलीत भेट घेतली. बावनकुळे हे मोटारसायकल वरून भिडे यांच्या घरापर्यत आले. विशेष म्हणजे भिडे आणि बावनकुळे यांच्यामध्ये बंद खोलीत चर्चा झाली. भिडे आणि बावनकुळे याच्या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

भेटीनंतर बावनकुळे यांनी संभाजी भिडे यांचा साधेपणासह त्यांच्या विनम्रतेची प्रशंसा केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन हे मोलाचे असल्याचे मत व्यक्त करीत ही भेट अविस्मरणीय असल्याचे सांगितले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण पृथ्वीराजबाबा देशमुख, शहरअध्यक्ष दीपकबाबा शिंदे , प्रदेश सदस्य शेखर इनामदार, निताताई केळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com