आदित्यला बाळ समजतो,पण उध्दव ठाकरेंचीच बालबुद्धी; नारायण राणेंचा घणाघात

आदित्यला बाळ समजतो,पण उध्दव ठाकरेंचीच बालबुद्धी; नारायण राणेंचा घणाघात

ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी भेट घेत विचारपूस केली. यानंतर उपमुख्यमंत्री फडतूस गृहमंत्री असल्याची टीका त्यांनी केली होती.

मुंबई : ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी भेट घेत विचारपूस केली. यानंतर उपमुख्यमंत्री फडतूस गृहमंत्री असल्याची टीका त्यांनी केली होती. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. आदित्य ठाकरेंसाठी तुम्ही काहीही केले नाही. तो सेफ नाही. आदित्यला बाळ समजतो मी. पण उद्धव यांची वय वाढलं फक्त, बुद्धी नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

आदित्यला बाळ समजतो,पण उध्दव ठाकरेंचीच बालबुद्धी; नारायण राणेंचा घणाघात
पुन्हा अशी भाषा वापरली तर...; पंतप्रधानांचे नाव घेत नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंना इशारा

बाळासाहेबांनी उध्दव ठाकरेंसाठी काम, कर्तृत्व करून ठेवले. आदित्य ठाकरेंसाठी तुम्ही काहीही केले नाही. तो सेफ नाही. मुलांसाठी काहीच केले नाही. त्यांना धोक्यात टाकू नका. आजपर्यंत मी आदित्यवर बोललो नाही. त्याला बाळ समजतो मी. पण उद्धव यांची बालबुद्धी आहे. वय वाढलं फक्त, बुद्धी नाही. विक्षिप्त माणूस आहे. मी फडतूस बोलणार नाही. दगाबाज माणूस आहे. विश्वास ठेवता येणार नाही, असा जोरदार घणाघात नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंवर केला आहे.

काल सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस मित्र होते. आज अजित पवार मित्र आहेत. काल सत्तेत असताना अजित पवारांबाबत काय बोलायचे हे मला माहिती आहे. पण, मी बोलणार नाही. मी चोंबडा नाही. ही आघाडी वरवरची आहे. टिकणारी नाही. पंतप्रधान, देवेंद्र फडणवीस यांवरील टीकेला माफी नाही. साहेबांकडे पाहून आम्ही गप्प होतो. आता तुम्ही तळ गाठला आहे. आता गड पडल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

बाळासाहेबांचे पुत्र सोडले तर देशाच्या प्रगतीत योगदान काय? कामगार, शेतकरी, विद्यार्थी प्रश्न माहिती आहेत का? बाळासाहेबांचे नाव, शरद पवारांचे मेहेरबानीने मुख्यमंत्री झाले. बाळासाहेबांच्या नखाची सर नाही. शिवसेना वाढीत उध्दव ठाकरेंचे योगदान काय? अडीच वर्षात काय कमावले शिवसेनेला काय दिले, असे प्रश्न नारायण राणेंनी उध्दव ठाकरेंना विचारले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com