'गाडीवर उभं राहण्याची कॉपी करून काही होत नसतं' भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
काल केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक वाद आणखीच तीव्र झाला आहे. त्यानंतर आज ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आज कारवर उभे राहून संबोधन केले. परंतु, यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा देखील असच फोटो व्हायरल होत आहे. या फोटोचा आणि उद्धव ठाकरेंचा संबंध यामध्ये जोडला जात आहे. त्यावरूनच आता भाजपने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
काय म्हणाले केशव उपाध्ये?
गाडीवर उभं राहून बाळासाहेब ठाकरेंनी भाषण केलं होतं त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंचं भाषण आहे अशी चर्चा सोशल रंगली आहे. त्यावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाष्य केलं आहे. गाडीवर उभं राहण्याची कॉपी करून काही होत नसतं. बाळासाहेब ठाकरेंनी दिवसरात्र मेहनत घेतली, कार्यकर्ता जपला, संघटना उभी केली, सत्तेवर शिवसैनिक बसवला. तर कॉपीबहाद्दर कधीही घराच्या बाहेर पडले नाहीत, कार्यकर्त्यांना भेटले नाहीत, उभी संघटना गमावली, विश्वासघाताने स्वतःच सत्तेवर बसले अशी तुलना करणारं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.