Budget 2023 : महिलांसाठी मोठी घोषणा; एसटी प्रवासात 50 टक्के सुट, तर स्टॅम्प ड्युटीत...

Budget 2023 : महिलांसाठी मोठी घोषणा; एसटी प्रवासात 50 टक्के सुट, तर स्टॅम्प ड्युटीत...

शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात देवेंद्र फडणवीस प्रथमच बजेट मांडत आहेत.

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात देवेंद्र फडणवीस प्रथमच बजेट मांडत आहेत. अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला असल्याचे फडणवीसांनी सभागृहात सांगितले. नुकताच महिला दिन झाल्याच्या पार्श्वभूमीवर सारे काही महिलांसाठी यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात महत्त्वाची म्हणजे सर्व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सुट मिळणार आहे.

Budget 2023 : महिलांसाठी मोठी घोषणा; एसटी प्रवासात 50 टक्के सुट, तर स्टॅम्प ड्युटीत...
Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वर्षाला मिळणार 12 हजार

चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करत आहोत. जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये, सहावीत गेल्यानंतर 6000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये देण्यात येतील. मुलगी 18 वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख 75,000 रुपये देण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली केली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येते. याचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे. तर, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येईल. मुंबईत युनिटी मॉलची स्थापना करून त्यात बचत गटांना स्थान देण्यात येईल. महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिली आहे.

नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे उभारणार असल्याची घोषणाही फडणवीसांनी केली आहे. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ही नवीन योजना कार्यन्वित करण्यात येईल. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा दिली जाईल,

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com