महाराष्ट्रातून 30 हजार कोटींचा बल्क ड्रग पार्कही गुजरातला, मला भीती वाटतेय... : सुभाष देसाई

महाराष्ट्रातून 30 हजार कोटींचा बल्क ड्रग पार्कही गुजरातला, मला भीती वाटतेय... : सुभाष देसाई

सुभाष देसाईंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली भीती

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीवरुन आता राजकारण तापले असून विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. सकारकडूनही आरोपांचे उत्तर प्रत्यारोपात देण्यात येत आहे. अशातच बल्क ड्रग पार्कदेखील महाराष्ट्राबाहेर गेल्याचा खुलासा माजी उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुभाष देसाई म्हणाले की, एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेला. बल्क ड्रग पार्क देखील आता गुजरातला गेलाय. मला आता भीती वाटतेय की यापुढे देखील महाराष्ट्रातून सर्व प्रकल्प असेच दुसरीकडे जाणार आणि हे सरकार गप्प राहणार, असा घणाघात त्यांनी केला.

तर, आदित्य ठाकरे यांनीही महाराष्ट्रातून बल्क ड्रग पार्क गुजरातला गेले आहे. हे उद्योग मंत्र्यांना माहिती आहे का? असा सवाल विचारत आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, 80 हजार आणि ते वेदांता प्रकल्पातून निर्माण होणारे दीड लाख रोजगार गेले त्याला जबाबदार कोण, महाराष्ट्राला हवे असणारे प्रकल्प पळवताहेत आणि नको असलेले प्रकल्प स्थानिकांवर थोपवताहेत, असा टोलादेखील उदय सामंतांना रिफायनरी प्रकल्पाबाबत लगावला आहे.

तत्पुर्वी, वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प माहिती तंत्रज्ञानावर आधारित असल्याने या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, तेलंगण व कर्नाटक या केवळ तीन राज्यांतच स्पर्धा होती. महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचा निर्णय जवळपास झाला असून केवळ केंद्र सरकारचा होकार घ्यावा लागेल, असे वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट करत मग आता अचानक गुजरात आले कुठून, असा सवाल सुभाष देसाई यांनी केला होता.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com