अखेर मुहूर्त ठरला! शिंदे सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार; 11 वाजता होणार शपथविधी

अखेर मुहूर्त ठरला! शिंदे सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार; 11 वाजता होणार शपथविधी

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पदभार स्वीकारल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू होती. अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला.

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पदभार स्वीकारल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू होती. अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शपथविधी पार पडणार आहे.

सत्ता स्थापन झाल्यानंतर सव्वा महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने विरोधकांकडून शिंदे सरकारला लक्ष्य करण्यात येत होते. परंतु, अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला असून उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, उद्याच मंत्र्यांचा शपथविधीही पार पडणार आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. 15 ते 16 आमदारांचा शपथविधी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. व 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

'हे' आहे सूत्र

भाजपचे 22 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, तर शिंदे गटाला 4 आमदारांमागे एक मंत्रिपद या सूत्राने 13 मंत्रिपदे देण्यात येतील. त्यात कॅबिनेट, राज्यमंत्रिपदे आहेत. तर, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गृहखाते भाजपकडेच राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते.

दरम्यान, बंडखोर नेते रामदास कदम यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर, मी मंत्रिमंडळात नसणार, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com