'वंदे मातरम्'साठी 26 जानेवारीपर्यंत अभियान राबविणार; मुनंटीवारांची माहिती

'वंदे मातरम्'साठी 26 जानेवारीपर्यंत अभियान राबविणार; मुनंटीवारांची माहिती

फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम शब्द वापरावा, असे आवाहन स्वातंत्र्य दिनी भाजप नेते सुधीर मुनंटीवार यांनी केले होते. यावरुन विरोधकांनी टीका केली.

नागपूर : फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम शब्द वापरावा, असे आवाहन स्वातंत्र्य दिनी भाजप नेते सुधीर मुनंटीवार यांनी केले होते. यावरुन विरोधकांनी आता टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर सुधीर मुनंटीवार यांनी विरोधकांच्या मतपरिवर्तनासाठी 26 जानेवारीपर्यंत अभियान करणार आहोत, अशी माहिती दिली. आणि या अभियानाच्या माध्यमातून भारतभूमीला वंदन करण्यासाठी ज्या अडचणी येतात त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुधीर मुनंटीवार म्हणाले की, गरीब कुटुंबात जन्मलेला एक व्यक्ती सर्वोच्च पदावर बसतो. अनुसूचित जमाती मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू आज देशाच्या राष्ट्रपती आहेत. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणार असं होणार नाही. राजकारणातही तुम्ही म्हणाल की परिवारावाद चालतो असं होणार नाही. सर्वांना संधी दिली पाहिजे आणि सगळ्यांना संधी मिळण्यासाठी परिवारवाद संपवण्याचे आणि राष्ट्रवाद निर्माण झाला पाहिजे.

फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम शब्द वापरावा, असे आवाहन स्वातंत्र्य दिनी केले होते. यावरुन विरोधकांनी आता टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर सुधीर मुनंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वंदे मातरम याचा अर्थच या भूमीला नमन करण्याचा आहे आणि याला जर कोणी विरोध दर्शवला असेल तर लोकशाही आहे. ज्यांनी विरोध केला आहे अशांचे मतपरिवर्तन करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंत अभियान करणार आहोत आणि या अभियानाच्या माध्यमातून भारतभूमीला वंदन करण्यासाठी ज्या अडचणी येतात त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. वंदे मातरम कोणताही राजकीय शब्द नाही. महाराष्ट्रामध्ये हे अभियान चालवायचे आहे. आम्ही सवय लावण्याचा प्रयत्न करु, असेही त्यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेकडे जी खाती होती. साधारणतः तीच शिवसेनेकडे आहे. भाजपने महत्त्वाचे खाते घेतले, असे म्हणणे योग्य नाही. भूमिकेची जी खाती होती ती आम्ही घेतलेली आहेत शिवसेनेने यावरती टीका करणे म्हणजे स्वतःची राजकीय भूमिका नाही आणि स्वतःचीच निंदा करण्यासारखा आहे, अशी टीका मुनंटीवार यांनी शिवसेनेवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com