Nitin Gadakari
Nitin Gadakari Team Lokshahi

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर गडकरींची प्रतिक्रिया; म्हणाले, भारताचं स्वप्न पूर्ण...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे.
Published by :
Sagar Pradhan

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2023-24 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यामध्ये सर्वसामान्यांना सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Nitin Gadakari
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारची मोठी घोषणा, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न आता करमुक्त

काय म्हणाले नितीन गडकरी?

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर बोलताना गडकरी म्हणाले की, निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. आमचा अर्थसंकल्प खूप वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात जागतिक दर्जाचे रस्ते तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू. ‘ग्रीन एनर्जी’, ‘ग्रीन पॉवर’ असा सर्वच ठिकाणी जो ‘ग्रीन’ उल्लेख झाला, हे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल आहे. असे गडकरी यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या अर्थव्यवस्थेला जगात सुपर इकॉनॉमिक पॉवर करण्यासाठी उपयोगी येईल. आता स्क्रॅपिंग धोरणामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागांमध्ये नव्या गाड्या येतील. त्यामुळे प्रदुषण कमी होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com