Nitin Gadkari
Nitin GadkariTeam Lokshahi

'माणूस जोपर्यंत हार मानत नाही तोपर्यंत संपत नाही...', नाराज गडकरींचे विधान

माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका
Published by :
Shubham Tate

Nitin Gadkari : मागील काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) चर्चेचा विषय ठरत आहेत. काहीना काही त्यांच्यासोबत घडतच आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या संसदीय बोर्डातून त्यांना हटवण्यात आले आहे.दरम्यान नागपूरमध्ये एका कार्यक्रमात याबाबतीत नितीन गडकरी (nitin gadkari)यांनी उद्योजकांसमोर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांचं वाक्य सांगत म्हणाले की, जेव्हा कोणताही व्यक्ती पराभूत होतो, याचा अर्थ तो संपत नाही मात्र जेव्हा तो स्वत: पराभव स्वीकारतो, त्याचवेळी तो संपतो. (central minister nitin gadkari richard nixon autobiography sentence in nagpur)

Nitin Gadkari
Zomato Delivery Boy : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेची चप्पलनं मारहाण, व्हिडीओ व्हायरल

विहिरीत उडी मारेन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही.

नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकार यांना चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करा, असे सांगितले होते.तसेच त्यावेळी ते श्रीकांत जिचकार यांना म्हणाले होते की, मी विहिरीत उडी मारुन मरुन जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण काँग्रेसची विचारधारा आपल्याला पसंत नाही.

Nitin Gadkari
तुमची मुले अकाली तरुण होतायत का? त्यामुळे ही लक्षणे दिसताच काळजी घ्या

ज्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका

पुढे गडकरी म्हणाले की, जे ही कोणी व्यवसायात, सामाजिक कार्यात किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे मोलाचा सल्ला देतो की, एखाद्याचे चांगले दिवस असो वा वाईट दिवस असो, जेव्हा तुम्ही ज्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका अस देखील गडकरी म्हणाले.याचवेळी त्यांनी सध्याच्या वापरा आणि फेकून द्या या संस्कृतीचा भाग होऊ नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com