Chandrakant Patil : समझने वाले को इशारा काफी है

Chandrakant Patil : समझने वाले को इशारा काफी है

एकनाथ शिंदेंवरुन चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सोमवारपासून संपर्काच्या बाहेर आहेत. यामुळे ठाकरे सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे. तर भाजपही ही संधी सोडणार नसल्याची चर्चा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी समझने वाले को इशारा काफी है, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यसभेला 123 आमदारांनी भाजपला मतदान केले. तर आणि परिषदेला 134 आमदारांनी मदत केली आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत ज्यांनी भाजपला विजयासाठी मदत केली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. महाविकास आघाडीतील नाराज आमदारांनी भाजपाला यशामध्ये मदत केली. त्यांनी आपली नाराजी, पक्षातील खदखद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती.

एकनाथ शिंदेंबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आता परिस्थिती बघणे गरजेचं आहे. आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदेना काय म्हणायचे हे मी काय सांगू, समझने वाले को इशारा काफी है, असेही त्यांनी म्हंटले आहे. तर भाजपने कोणताही प्रस्ताव एकनाथ शिंदेला पाठवला नाही. आणि एकनाथ शिंदेंनीही प्रस्ताव दिलेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

अडीच वर्षांआधीच अनेक आमदारांनी जर तुम्हाला राष्ट्रवादी, काँग्रेसबरोबर जायचे तर आम्ही तयार नाही, असा इशारा शिवसेना पक्षनेतृत्वाला इशारा दिला होता, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरुन हक्कलपट्टी केल्यावरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, गटनेता निवडावा हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. मी यावर बोलायला तज्ञ नाही. आताची जी स्थिती निर्माण झाली आहे ही त्यांच्या कर्माने झाली आहे. हे सरकार त्यांच्या अंतर्गत कलहानेच पडेल. यामुळे भाजप अविश्वास प्रस्ताव आणणार नाही . तसेच, अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी परिस्थिती तशी असावी लागतं आहे. अधिवेशन 18 जुलैपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता अविश्वास ठराव आणण्याची ही वेळ नाही. हे राज्यपाल असे आहेत की ते रोज पहाटे उठतात त्यामुळे एका दिवसासाठी ते उठत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com