Chandrakant Patil| Aditya Thackeray
Chandrakant Patil| Aditya ThackerayTeam Lokshahi

जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारताय- चंद्रकांत पाटील

वेदांत प्रकल्प कोणामुळे महाराष्ट्रच्या बाहेर गेला हे सर्वांना समजेल

राज्यात अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेलं आहे. अनेक आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सध्या सुरूच आहे. शिवसेना आणि शिंदे गटात वाद होत असताना भाजप देखील शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडत नाहीय. भाजप नेते आणि राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी आदित्य ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

Chandrakant Patil| Aditya Thackeray
आव्हान स्वीकारा, मग कळेल दिवा कोण आणि सूर्य कोण? अंबादास दानवेंचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

काय म्हणाले मंत्री चंद्रकांत पाटील?

सांगलीत बोलत असताना पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे जसजसे जनआक्रोश यात्रेच्या निमित्ताने बाहेर पडतील तसं वेदांत प्रकल्प कोणामुळे महाराष्ट्रच्या बाहेर गेला हे सर्वांना समजेल. शक्ती वापरण्यासाठी निर्माण करायची नसते, शक्ती भीती दाखवण्यासाठी निर्माण करायची असते. जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. अश्या शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

Chandrakant Patil| Aditya Thackeray
न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला, पहिल्या न्यायालयीन विजयानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोर्टाने दसरा मेळव्याबाबत दिलेल्या आजच्या निर्णयावर बोलण्याचं टाळलं आहे. ते म्हणाले, कोर्टाच्या निर्णयावर कधीही टिप्पणी करणे मला योग्य वाटत नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Lokshahi
www.lokshahi.com