Chandrashekhar Bawankule | Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule | Devendra Fadnavisteam lokshahi

अमरावतीमध्ये पुढचा खासदार भाजपचाचं बावनकुळेंच्या विधानावर फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

बावनकुळेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले रवी राणा?
Published by :
Shubham Tate

अमरावतीमध्ये आज खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये पुढचा खासदार कोण होणार यावर विधान केले. ते म्हणाले की, अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेरचा पुढचा आमदार कमळ चिन्हावर निवडून येईल. असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे. बावनकुळे फार सूचक बोलले आहेत, तसेच नवनीत राणा आणि रवी राणा आमच्यासोबतच आहेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळं राणा दाम्पत्य भाजपच्या तिकिटावर लढणार का, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. (Chandrasekhar Bawankule in Amravati was visited by Devendra Fadnavis)

Chandrashekhar Bawankule | Devendra Fadnavis
या सरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना नक्की स्थान मिळणार - शर्मिला ठाकरे

काय म्हणाले होते बावनकुळे

आज अमरावतीत राणा दाम्पत्य यांच्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत असताना बावनकुळे म्हणाले की, पुढील अमरावतीच्या खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार कमळावर निवडूण येईल, अमरावतीचा पुढील महापौर हा भाजपचाचं असेल. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सुध्दा भाजपचा असेल. त्यामुळं काही काळजी करू नका, असं म्हणत भाजप बावनकुळे यांनी राणा दाम्पत्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.

Chandrashekhar Bawankule | Devendra Fadnavis
पंकजा मुंडेंच्या कामाची स्तुती करत शर्मिला ठाकरे म्हणाल्या मंत्रिपद दिलं तर चांगलंच

काय म्हणाले फडणवीस

खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार हा कमळाचा असेल. बावनकुळेंच्या या विधानावर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस यांनी जास्त न बोलता एका वाक्यात माध्यमांना उत्तर दिले. ते म्हणाले की, बावनकुळे फार सूचक बोललं नवनीत राणा आणि रवी राणा आमच्यासोबतच असे बोलत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

बावनकुळे यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले रवी राणा ?

चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर बडनेऱ्याचे आ. रवी राणा काहीही बोलायला तयार नाहीत. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की,“आम्ही भाजपसोबत आहोत. गेली अनेक वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी मला विधानसभा निवडणुकीत मदत केली. नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली. पण मी युवा स्वाभिमान पक्षात आहे. हा पक्ष अनेक जिल्ह्यात वाढवलाय, असं म्हणत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार का? याबाबत रवी राणा काही स्पष्ट बोलले नाही. रवी राणा म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मला मोठ्या भावासारखे आहेत. मी फडणवीस आणि भाजपसोबत आहे. गेल्या दहा वर्षांपासून फडणवीस यांनी मला मदत केली आहे. मी युवा स्वाभीमानी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मात्र, राणा यांनी प्रश्नाला टाळलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com