Prakash Ambedkar | Chandrashekhar Bawankule
Prakash Ambedkar | Chandrashekhar BawankuleTeam Lokshahi

प्रकाश आंबेडकरांचे 'ते' विधान म्हणजे मानसिक दिवाळखोरीचं लक्षण; बावनकुळेंचे टीकास्त्र

पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर

मुंबई : 2024 मध्ये गैरभाजप सरकार सत्तेत आलं तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे विधान काल वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. या विधानावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. हे विधान म्हणजे मानसिक दिवाळखोरीचं लक्षण असल्याचे बावनकुळेंनी म्हंटले आहे.

Prakash Ambedkar | Chandrashekhar Bawankule
हिंम्मत असेल तर सोमय्यांनी इथे यावं, शिवसेना स्टाईलने स्वागत करू; अनिल परबांचे खुलं आव्हान

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे त्यांनी विक्षिप्तपणाने केलंय. महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत बोलले हे मानसिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. आमच्या नेतृत्त्वावर टिकाटिप्पणी केली तर राज्यभर प्रकाश आंबेडकर यांचा निषेध व्यक्त करावा लागेल. अशा वक्तव्यामुळे जो असंतोष निर्माण झाला महाराष्ट्रात याचा उद्रेक होईल असं वाटतेय, असा सूचक इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

2024 मध्ये गैरभाजप आणि आरएसएसचे सरकार सत्तेत आलं तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. झुकानेवाला चाहिये, सरकार उसके सामने झुकती है. 2024 मध्ये यांना झुकावं लागेल, हेच आव्हान मी देतोय, असे आंबेडकर म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com