उद्धव ठाकरे सत्ता गेल्यामुळे बावचाळलेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे सत्ता गेल्यामुळे बावचाळलेत : चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा

मुंबई : राज्यासाठी आजचा दिवस राजकीय धुरळ्याचा ठरणार आहे. मुंबईत इतिहासात शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहे. त्यामुळे या रॅली आणि सभांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवेसना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे सत्ता गेल्यामुळे बावचाळले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

पुढील निवडणुकीत कमळाबाईची अशी जिरणार आहे की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच, असे टीकास्त्र शिवसेनेने सामना संपादकीयमधून भाजपवर सोडले आहे. यावर उद्धव ठाकरे यांच्या मनात हृदयात जे आहे ते सामन्यातून लिहितात. ते सत्ता गेल्यामुळे बावचाळले आहे. त्यांचा संयम सुटला आहे, असे प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

तर, भारतीय जनता पार्टी 100 टक्के जिंकेल. आमच्या युतीच्या माध्यमातून अंधेरीमधून आमचा ऐतिहासिक विजय होईल. उद्धव ठाकरे यांनी कधी विचारही केला नसेल एवढा विजय आमचा होईल. दोन-अडीच वर्षाचा राग या विधानसभेत निवडणुकीत निघेल. उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार सुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती त्यांची होईल, असा दावाही बावनकुळेंनी केला आहे.

शिवसेना व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा समर्थन घेऊन त्यांची गर्दी आणून उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. शिंदे यांच्याकडे 40 आमदार, बारा खासदार आहेत. मोठे जनशक्ती त्यांच्याकडे आहे. एवढा मोठा गट जर शिंदे यांच्याकडे असेल तर मोठ्या प्रमाणात त्यांचा मेळावा होईल.

काही लोक टीका करतात की सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. मात्र, अडीच वर्षात त्यांनी सत्तेचा किती दुरुपयोग केला. किती मस्ती केली, कसं सरकार चालवलं, सोशल मीडियाच्या छोट्या कार्यकर्त्यांना कारागृहात टाकलं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आजची सभा ही सभा म्हणजे टोमणे सभा होणार आहे, ते फक्त टोमणे मारतील तेच अपेक्षित आहे. त्यांना दुसरा आता काम नाही. एकनाथ शिंदे हे विकासाच्या बाबतीमध्ये बोलतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com