Chandrashekhar Bawankule : जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं

Chandrashekhar Bawankule : जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं

२२ जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

२२ जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. एकीकडे या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जो न हित के राम का वह न किसी के काम का! काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं. रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. मंदिराचा ७/१२ मागत होते.

राम मंदिराच्या निर्मितीबाबत अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत होते. रामभक्तांची खिल्ली उडवत होते. आता पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं आहे. यापूर्वी काँग्रेसनं अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं. जय श्रीराम! असे बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com