Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Team Lokshahi

बारामतीमध्ये घडी बंद करण्याचा प्रयत्न, बावनकुळे यांची टीका

'कॉंग्रेसची भारत जोडो' यात्रा ही फुसका बार
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून राजकरण प्रचंड तापलेलं आहे. या परिस्थितीचा फायदा घेत अनेक पक्ष संघटना आपल्या पक्ष बांधणीवर भर देत आहे, भाजपने देखील मोर्चे बांधणीवर भर दिली आहे. भाजप लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वतोपरी तयारी सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री हे राज्यात दाखल झाले आहेत. बारामती मतदार संघात अर्थमंत्री निर्मला सितारमण ह्या असून या मतदार संघात घडी बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले आहेत.

Chandrashekhar Bawankule
पुण्यात पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

बारामती मतदार संघात अर्थमंत्री निर्मला सितारमण ह्या दाखल झाल्या होत्या. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, बारामती मतदार संघामध्ये घडी बंद पाडण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे जनता काय निर्णय देते हे देखील तेवढेच महत्वाचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे जनतेचा निर्णय आम्हाला मान्यही असेल असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कॉंग्रेसच्या माध्यमातून देशभर भारत जोडो यात्रा काढली जात आहे. राहुल गांधी हे यात्रेचे नेतृत्व करीत आहेत. तर यात्रेला सर्वसामान्यांचा प्रतिसाद नाही. शिवाय यात्रेत सहभागी असलेले सर्वजण हे कार्यकर्तेच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यात्रा ही फुसका बार असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.

Chandrashekhar Bawankule
शिंदेगटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी ट्वीट केलेला सुप्रिया सुळेंचा 'तो' फोटो एडिटेड

राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केलेले एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यावर बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट नकार दिला आहे. ते म्हणाले, अमित शाह यांना केलेल्या फोनवर हे एकनाथ खडसे हेच अधिक स्पष्ट सांगून शकतील असे म्हणून बावनकुळे म्हणाले।

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com