फडणवीसांचे 'ते' ट्विट कुणी केलं? चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले...

फडणवीसांचे 'ते' ट्विट कुणी केलं? चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले...

भाजप महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सूचक ट्विट करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजप महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सूचक ट्विट करण्यात आले आहे. यात देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर केला असून नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन, असे कॅप्शनमध्ये लिहीले आहे. या ट्विटवरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 2024 पर्यंत शिंदेच मुख्यमंत्री राहतील. अतिउत्साही कार्यकर्त्याने फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट केला. जर व्हिडिओ ट्विट करायचा असता तर नवा व्हिडिओ ट्विट केला असता. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्याची इच्छा. एका अतिउत्साही कार्यकर्त्याने तो व्हिडिओ टाकला.

तो महाजनादेश यात्रेचा व्हिडिओ आहे. 2024 मध्ये विधानसभा निवडणूका होतील तेव्हा देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र निवडणूकीला सामोरे जाईल. असे बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com