महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याशिवाय राहणार नाही : बावनकुळे

महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याशिवाय राहणार नाही : बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला

मुंबई : तीन पक्ष केवळ सत्तेपासून पैसा पैसे पासून सत्ता हाच महाविकास आघाडीचा फॉर्मूला आहे. महाविकास आघाडी कितीही एक झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. महाविकास आघाडीची वज्रमूठ झाल्याशिवाय सैल झाल्याशिवाय राहणार नाही, अशी जोरदार टीकास्त्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआवर सोडले आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर बावनकुळेंनी शरसंधान साधले आहे.

महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याशिवाय राहणार नाही : बावनकुळे
झिरवळ दांपत्यावर नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव; केला सलाम

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. मात्र, बाळासाहेबांचं नाव आमच्या हृदयात असून बाळासाहेबांचा आदर्श ठेवूनच आमचं सरकार काम करत असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर, विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना टीका करावी लागते, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

जगातल्या 78 टक्के नागरिकांनी मोदींचे कौतुक केले आहे. शरद पवारांनी केले तर काय बिघडलं? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीचा वेगवेगळा विचार वेगवेगळी भूमिका आहे. तर तीनही पक्षाची भूमिका ही भाजपला थांबवण्यासाठी असून तीन पक्ष केवळ सत्तेपासून पैसा व पैसे पासून सत्ता हाच महाविकास आघाडीचा फार्मूला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. महाविकास आघाडी कितीही एक झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. महाविकास आघाडीची वज्रमूठ झाल्याशिवाय सैल झाल्याशिवाय राहणार नसल्याचा टोला बावनकुळेंनी लगावला आहे.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे, मात्र दिसतात वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे, असे विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. यावर बावनकुळेंनी उद्धव ठाकरे नेहमी माझा वर्ण काढतात. मला आफ्रिकन म्हणतात व माझ्या मुलाचा उल्लेख करतात. योग्य काळ आल्यावर उद्धव ठाकरेंना कळेल कोण कोणाच्या गिणतीत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com