Chandrashekhar Bawankule : देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळे उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागलं

Chandrashekhar Bawankule : देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळे उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागलं

रंगशारदा सभागृहात शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा मेळावा पार पडला.
Published by  :
Siddhi Naringrekar

रंगशारदा सभागृहात शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उध्दव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी किती दिवस दुसऱ्यांची ओझी वाहणार. अजुन किती उपमुख्यमंत्री करणार आहात. आता देवेंद्रजींची दया येते. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना उपरोधात्मक टोला.

याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बावनकुळे यांनी ट्विट करत टीका केली आहे की, ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय? मा. नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं.

औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. 2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय.असे बावनकुळे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com