राज ठाकरे यांचा स्वभाव दिलदार; बावनकुळेंकडून स्तुतीसुमने

राज ठाकरे यांचा स्वभाव दिलदार; बावनकुळेंकडून स्तुतीसुमने

मनसे-भाजप युतीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

कल्पना नालस्कर | नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची निवासस्थानी भेट घेतली. यानंतर भाजप-मनसे युती होणार असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही कोणतीही राजकीय भेट नसल्याचे सांगितले आहे. सोबतच, राज ठाकरे यांचा स्वभाव दिलदार असल्याचे कौतुकही त्यांनी केले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नागपूरमधील जेएमफसी कोर्टाने जामीन पात्र वॉरंट पाठवले आहे. त्याची आज तारीख आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गरिबांना मोफत अन्नाची योजना राज्य सरकार योग्य पद्धतीने राबवत नव्हतं. केंद्र सरकार अन्न द्यायचं. पण, महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या काळात झोपलेलं होतं. त्यामुळे मला मोर्चा काढावा लागला होता. व त्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचसाठी आज कोर्टात जावं लागत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

राज ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी त्यांना विनंती केली होती नागपुरात आल्यावर माझ्याकडे चहा घ्यायला या. ते आज चहा घ्यायला आले आहे. कुठलीही राजकीय भेट नाही किंवा राजकीय कुठलीही चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

आमच्या भेटीगाठीचा अर्थ बिल्कुल असा नाही. राज ठाकरे यांचा मैत्री करण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट असा स्वभाव आहे. ते बिनधास्त बोलतात, दिलदारपणे वागतात, अशी स्तुती बावनकुळे यांनी राज ठाकरेंची केली आहे.

ते म्हणाले की, आम्ही ठरवलं आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती प्रामाणिकपणे चालणारी आहे. आणि देवेंद्र फडणवीस आणि पार्लमेंटरी बोर्ड या युतीमध्ये लढणार आहेत. आणि युतीमध्ये जो उमेदवार असेल त्यांच्या मागे संपूर्ण संघटना उभी करणे आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. बुलढाणा भूपेंद्र यादव लोकसभा प्रवास योजनेत आलेले आहेत आणि ते 18 महिने प्रवास करणार आहेत. 22, 23, 24 ला निर्मला सीताराम येणार आहेत. जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाची व माझी राहील, असेही बावनकुळेंनी म्हंटले आहे.

भारतीय जनता पक्ष-एकनाथ शिंदे शिवसेना इतकी चर्चा आहे. इतकाच विषय आहे. आज एनडीए पक्षाचे घटक पक्ष रामदास आठवले आहेत. त्यांची आमच्यासोबत युती आहे. त्यामुळे एनडीएचे जे घटक पक्ष आहेत ते देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करतात. त्यांच्याशी युती आहे. पण, मनसेसोबत कोणत्याही पद्धतीची युती नाही. आणि चर्चाही नाही. बंद दाराच्या आत नाही आणि बाहेरही चर्चा नाही. त्यामुळे याचा काही अर्थ काढू नये, असे म्हणत बावनकुळेंनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांवर पुर्णविराम लावला आहे.

राज ठाकरे पक्ष वाढवत आहे. त्यासाठी प्रयत्न करतायत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी काम सुरू केले आहे. निवडणुकीत उमेदवारासाठी ते त्यांच्या पक्षाच काम ते करतील. आमच्या पक्षाचे काम आम्ही करू. आव्हान तर शेवटी जनता ठरवेल. लोकशाहीमध्ये आव्हान त्या मतपेटीत बंद होते. मतपेटीच्या निकालानंतरच ठरतं कोणाचा प्रभाव जास्त आहे. कोणाचा उमेदवार जिंकतो आणि कोणाचा उमेदवार नाही. त्यामुळे आजही सांगता येत नाही मनसे की भाजप आमचा प्रयत्न भाजपचा आहे. आमचे विदर्भामध्ये 45 पेक्षा जास्त विधानसभा निवडून याव्यात त्यासाठी आम्ही काम करतो आहे. आज ग्रामपंचायतचे निवडणूक निकाल सुद्धा भाजपच्या बाजूने येतील 4 वाजता निकाल बघा, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com