तू सासरची भाकरी खातोस ना तर गप्प खा; भुजबळांची जरांगेंवर हल्लाबोल, कुणबींच्या नावाखाली...

तू सासरची भाकरी खातोस ना तर गप्प खा; भुजबळांची जरांगेंवर हल्लाबोल, कुणबींच्या नावाखाली...

भिवंडीत आज ओबीसी समाजाचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळाले आहे.

भिवंडी : मनोज जरांगे पाटील आमची लायकी काढतो, काहीही बोलतो. मला येवल्याचा येडपट बोलतो. तू सासरची भाकरी खातोस ना तर गप्प खा, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. ते आज भिवंडीतील ओबीसी मेळाव्यात बोलत होते. आमची लायकी काढणारा तो कोण, असा सवालही भुजबळांनी जरांगेंना केला आहे.

तू सासरची भाकरी खातोस ना तर गप्प खा; भुजबळांची जरांगेंवर हल्लाबोल, कुणबींच्या नावाखाली...
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला

छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आमचा विरोध नाही. आमचा विरोध जाळपोळीला आहे, दादागिरीला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, परंतु आरक्षण मिळण्याआधी त्यांचे वाटेकरी आले आहेत. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव मोहिम नाही, असं विधानही त्यांनी केलं.

जरांगे आपली लायकी काढतो. येवल्याचा येडपट बोलतो. आमची लायकी काढू नका आमचे पोरं हुशार आहेत. जरांगे तू तुझी तब्येत सांभाळ. बेवडा पिऊन पिऊन तुझा किडन्या सडल्या आहेत. इलेक्शन येत आहेत सगळ्यांना ध्यान ठेवा, असेही भुजबळांनी म्हंटले आहे.

सुतार पण कुणबी, लोहार पण कुणबी, ब्राह्मण कुणबी खोटी सर्टिफिकेट दिले जात आहेत. कुणबींच्या नावाखाली खोटे दाखले दिले जात आहेत. जातगणना करा दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा, अशी मागणी त्यांनी केली आहे. साखळी उपोषण करा ठिकठिकाणी कॅण्डल मोर्चे काढा गावागावातून प्रचार करा ओबीसीला जागा करा, असे आवाहनही छगन भुजबळांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com