Chhagan Bhujbal : ओबीसीत मराठा आले तर कुणालाच काही मिळणार नाही

Chhagan Bhujbal : ओबीसीत मराठा आले तर कुणालाच काही मिळणार नाही

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
Published by  :
Siddhi Naringrekar

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या ओबीसीतून नको. ओबीसीमध्ये जे आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु. मराठा आरक्षणाला विरोध नाही. 2 दिवसांत कुणबी नोंदी वाढल्या कशा? मराठ्यांना ओबीसीतून सर्व प्रकारचे आरक्षण हवंय.

ओबीसीसाठी कायदेशीर लढाई सुरु. कायद्यातल्या त्रुटी दूर करुन आरक्षण द्या. ओबीसीत मराठा आले तर कुणालाच काही मिळणार नाही. ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. ओबीसीतून आरक्षणही हवं आणि एकीकडे याचिकाही दाखल करायची. ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका. ओबीसी आरक्षण वाचवणं हा माझ्यासमोर प्रश्न. असे छगन भुजबळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com