विशेष अधिवेशनाआधी छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया म्हणाले...

विशेष अधिवेशनाआधी छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया म्हणाले...

मराठा आरक्षणाबाबत राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणाबाबत राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी हे विशेष अधिवेशन असणार आहे. हे एक दिवसीय विशेष अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, सगेसोयऱ्यांच्या संदर्भात साडेसहा लाख हरकती. हरकतींचा अभ्यास करावा लागेल, त्यासाठी वेळ लागेल. अद्याप कायदा करण्यात येणारा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही.

शुक्रे समितीने काढलेल्या मराठ्यांच्या टक्केवारीला नाकारतो. कुठल्याही सर्वेवर आमचा विश्वास नाही. जातनिहाय जनगणना करा. मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याचा सरकारचा उद्देश. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल माझ्याकडे आलेला नाही. अधिवेशनात प्रत्येकाला बोलण्याची संधी द्यावी. असे छगन भुजबळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com