CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धीरेंद्र शास्त्रीच्या दरबारात

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धीरेंद्र शास्त्रीच्या दरबारात

महाराष्ट्राला पुरोगामित्वाची मोठी परंपरा असताना ही परंपरा बाजुला सारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धीरेंद्र शास्त्रीच्या दरबारात जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला पुरोगामित्वाची मोठी परंपरा असताना ही परंपरा बाजुला सारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धीरेंद्र शास्त्रीच्या दरबारात जात आहे. धीरेंद्र शास्त्री भाकीत आणि भविष्यांमुळं वादात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वादग्रस्त धीरेंद्र शास्त्रीच्या दरबारात जाऊन आरती करणार आहेत. पुण्यात धीरेंद्र शास्त्रीचा दरबार भरवण्यात आलाय.

धीरेंद्र शास्त्रीच्या दरबारात दुपारी चार वाजता मुख्यमंत्री हजेरी लावणार आहे. तेरा कोटी जनतेचं प्रतिनिधीत्व करणारे मुख्यमंत्री धीरेंद्र शास्त्रीच्या चरणी लीन होणार असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री एका भाकीतं सांगणाऱ्या बाबाच्या दरबारात हजेरी लावत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय. वैयक्तिक श्रद्धा पाळणं ठीक आहे पण मुख्यमंत्रि‍पदावर बसलेल्या व्यक्तीनं एका कुडमुड्या बाबाच्या दर्शनाला हजेरी लावणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com