मंगल प्रभात लोढांना भाजपकडून घरचा आहेर; 
'गं.भा.'वर चित्रा वाघ यांचाच आक्षेप

मंगल प्रभात लोढांना भाजपकडून घरचा आहेर; 'गं.भा.'वर चित्रा वाघ यांचाच आक्षेप

खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ चित्रा वाघ यांचा 'गं. भा.' शब्दास आक्षेप

मुंबई : विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही भाजपला घरचा आहेर दिला आहे. 'गं.भा.' लिहिण्यास चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. 'गं.भा.' ऐवजी महिलांचा 'श्रीमती' म्हणून उल्लेख करा, अशीही सूचना त्यांनी केली आहे.

मंगल प्रभात लोढांना भाजपकडून घरचा आहेर; 
'गं.भा.'वर चित्रा वाघ यांचाच आक्षेप
विधवा महिलांना 'गंगा भागीरथी' म्हणणे वेदनादायी; सुप्रिया सुळेंचे लोढांना पत्र

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

गं.भा. म्हणजे गंगा भागीरथी…नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन केशवपन केलेल्या स्त्रीला गं.भा. म्हणायची, लिहायची पद्धत होती. याऐवजी कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी, सौभाग्यवती, श्रीमती ... असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनीही मंगल प्रभात लोढा यांना पत्र लिहीत हा शब्द मागे घेण्याची मागणी केली होती. राज्य सरकार राज्यातील विधवा महिलांसाठी 'गंगा भागिरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत विचार करीत असल्याचे समजले. हे अतिशय वेदनादायी आहे, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com