तुम्हाला दारोदार फिरावं लागत, यावरून तरी ओळखा कलंक कोण? - चित्रा वाघ

तुम्हाला दारोदार फिरावं लागत, यावरून तरी ओळखा कलंक कोण? - चित्रा वाघ

ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवर जाहीर सभा घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवर जाहिर सभा घेतली. यावेळी उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात फडणवीस हे एकवेळ भाजप सत्तेत राहणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही. असे म्हणत आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

याच पार्श्वभूमीवर आता चित्रा वाघ यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. चित्रा वाघ ट्विट करत म्हणाले की, उद्धव ठाकरे जी खरं बोलताय, काळ हा निघृण असतो. हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणाला माहित असणार. बघा ना तुमच्याकडे काय नव्हतं..?? पद पैसा मान सन्मान विचारधार. जोपर्यंत भाजप सोबत तुम्ही होतात तोपर्यंत सगळं होतं. पण जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या लालसेनं देवेंद्रजींना दगा दिलात तेव्हा पासून नियती तुमचा सूड उगवतेय. तुम्हाला दारोदार फिरावं लागत आहे यावरून तरी ओळखा कलंक कोण आहे. असे चित्रा वाघ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com