CM Eknath Shinde : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

CM Eknath Shinde : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी सातच्या सुमारास मुंबईतील धारावी या ठिकाणी जाऊन स्वच्छ मुंबई मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मला विश्वास आहे की महायुतीला अपेक्षित असे यश मिळेल. आणखी वेळ गेल्यावर निकाल स्पष्ट होतील. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com