Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

रात्री 9:30 वाजता मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद, राजीनाम्याची करणार घोषणा?

उद्या सकाळी ११ वाजता विश्वासमत चाचणीला सरकारला सामोरे जावे लागणार
Published by :
Shubham Tate

Uddhav Thackeray Eknath Shinde : बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे उद्या सकाळी ११ वाजता विश्वासमत चाचणीला सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी ठाकरे सरकारचा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच रात्री 9:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी साधणार संवाद साधणार आहेत. तर नेते अनिल परब हे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (CM Uddhav Thackeray to interact with people at 9:30 pm, announce resignation?)

Uddhav Thackeray
Maharashtra Floor Test : स्थगिती नाही, उद्याच बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलमध्ये असलेले मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना उद्याच्या विश्वासमत चाचणीला उपस्थित राहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला परावानगी दिली आहे. यापूर्वी राज्यसभा आणि विधान परिषद निवडमुकीत मतदानाला हजर राहता आले नव्हते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com