congress
congressTeam Lokshahi

राज्यसभेच्या जागेसाठी कॉंग्रेसची उमेदवारी घोषित; नेते नाराज

राज्यसभेसाठी कॉंग्रेसचे मुस्लिम कार्ड

नवी दिल्ली : राज्यसभेच्या सहा जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या उमेदवारीसाठी राज्यात रोज राजकीय नाट्य घडताना दिसत आहे. अशातच कॉंग्रेसनेही (Congress) आज राज्यसभेच्या जागेसाठी आपला उमेदवार घोषित केला आहेत. इमरान प्रतापगडी (Imran Pratapgarhi) यांना काँग्रेसकडून राज्यसभेवर महाराष्ट्रातून संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. परंतु, या घोषणेनंतर कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफळला आहे.

congress
'लोकशाही'च्या स्पर्धेत मुंबईतील प्रियंकाला मिळाला टीव्ही

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून इमरान प्रतापगडी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून ते उद्या अर्ज भरणार असल्याचे समजते आहे. परंतु, या निणर्यावर राज्यातील कॉंग्रेस जनांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील अनेक जण इच्छुक असतानाही बाहेरील नेत्याला संधी दिल्याने कॉंग्रेस नेते नाराज झाले असल्याचे समजते आहे. परंतु, कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी अल्पसंख्याकाला उमेदवारी देण्याबाबत आग्रही असल्याने ही उमेदवारी इमरान प्रतापगडी यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. तर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील नाराजी हाय कमांडसमोर मांडणार असल्याचे सांगितले.

congress
Nana Patole : भाजपने संभाजी राजेंचा राजकीय खून केला

दरम्यान, इमरान प्रतापगडी हे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत. तसेच, बिहारमधून कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार, कर्नाटकमधून बी.व्ही. श्रीनिवास यांची राज्यसभेच्या उमेदवारीसाठी नावे चर्चेत आहेत.

congress
बृज भूषण सिंह उत्तर प्रदेशचे नाव खराब करत आहेत; उत्तर भारतीयांनीच केली टीका

विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com