काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; राहूल गांधी 'या' जागेवरुन निवडणूक लढणार
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण ३९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसच्या ३९ उमेदवारांच्या या पहिल्या यादीत १५ उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत, तर २४ उमेदवार मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि वर्गातील समाजातील आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तारीख पुढील आठड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली. राहुल गांधींसह पहिल्या यादीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नावाचा समावेश आहे.
काँग्रेस उमेदवारांची यादी
राहुल गांधी- वायनाड
भूपेश बघेल- राजनांदगांव
शशी थरूर- तिरुवनंतपूरम
शिवकुमार दहिया- जांजगीर चांपा
डीके सुरेश- बेंगळुरू ग्रामीण
दरम्यान, ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांनी तिरुअनंतपुरम येथून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा मुकाबला आता केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांच्याशी होणार आहे. केरळमधून राम्या हरदास, हिबी एडन, के. सुधाकरन, के. मुरलीधरन, डीन कोरईकोस, के. सुरेश, अँटो अँटोनी या विद्यमान खासदारांवर पक्षाने पुन्हा विश्वास दाखविला आहे.