काँग्रेस उमेदवाराचा मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न

काँग्रेस उमेदवाराचा मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न

गुजरात निवडणुकीचा निकालचा आज निकाल समोर येत आहे. भाजपाने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला असून काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झालेली दिसत आहे.

अहमदाबाद : गुजरात निवडणुकीचा निकालचा आज निकाल समोर येत आहे. भाजपाने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला असून काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झालेली दिसत आहे. अशातच काँग्रेसच्या एका उमेदवाराने थेट मचमोजणी केंद्रावरच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे.

काँग्रेस उमेदवाराचा मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न
गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2022: भाजपाच्या आघाडीवरील उमेदवारांची संपूर्ण यादी

गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा करिष्मा पाहायला मिळाला आहे. काँग्रेसला धोबीपछाड देत मिळवल्या भाजपाने दीडशे जागा मिळवल्या आहेत. गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरुवात केली आहे. यानुसार भाजप सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणार आहे. तर, कॉंग्रेसला आतापर्यंत 19 जागा मिळाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गांधीधामचे उमेदवार भरत सोलंकी यांनी मतमोजणी केंद्रावरच आत्महत्येचा प्रयत्न केला. भरत सोलंकी यांनी गळ्यात फास बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com