Ashok Chavan: काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

Ashok Chavan: काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती.
Published by :
Siddhi Naringrekar

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

या पत्रात अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की, मी 12 फेब्रुवारी 2024 मध्यान्हानंतर पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे. आपला विश्वासू, अशोकराव शंकरराव चव्हाण. असे म्हटले आहे.

पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या कॉपीमध्ये विधानसभा सदस्याचा पुढे माजी हा शब्द लिहण्यात आलेला आहे. या वरून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com