सत्यजित तांबेंवर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे पक्षीय राजकारण...
राज्यात नुकताच पाच जागांसाठी शिक्षक आणि पदवीधर निवडणुका पार पडल्या. परंतु, या पाच जागांपैकी चर्चेत राहिली ती नाशिकची जागा या ठिकाणी उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. बंडखोरीकरून अपक्ष उभे राहिलेले सत्यजित तांबे विजयी झाले. मात्र, यादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. परंतु, विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मोठे गौप्यस्फोट केले आणि थेट महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केले. दरम्यान, आता या प्रकरणावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले थोरात?
संगमनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठे राजकारण झाले. सत्यजीत या निवडणूक चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झाले, ते दुर्दैवी होते. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. त्यामुळे याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, मागील काही दिवस थोरात रूग्णालयात उपचार घेत होते, यावरही त्यांनी भाष्य केले आहे. डॉक्टरांनी प्रवास करू असे मला सांगितले होते. म्हणून मला कुठे जाता आले नाही. मधल्या काळात अशा काही बातम्या आल्या की, आम्हाला त्यांनी भाजपपर्यंत पोहचवले होते. मात्र आपला काँग्रेस आहे. काँग्रेस हा आपला विचार आहे. आपण नेहमी काँग्रेस सोबत राहू. असे देखील थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले.