Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, तर गुजरातचे मुख्यमंत्री; नाना पटोलेंचा घणाघात

मुख्यमंत्र्यांनी स्वत:चं म्हणाले की, ते मोदी शहांचे हस्तक आहेत. त्याच्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री नाहीत

राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये प्रकल्पावरून जोरदार घमासान सुरु आहे. राज्यातून प्रकल्प गुजरातला गेले याचे खापर सध्या विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर फोडत आहे. हा वाद चालू असताना आता त्याच विषयावरून आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसून ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्याचे, असे विधान नाना पटोले यांनी केले आहे.

Nana Patole
IND Vs ZIM : झिम्बाब्वेवर भारताचा दणदणीत विजय, आता सेमीफायनलमध्ये देणार 'या' संघाला आवाहन

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असलेले एकनाथ शिंदे हे महाराष्टराचे मुख्यमंत्री नसून ते गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. या कारणाने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये चालले आहेत. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चं म्हणाले की, ते मोदी शहांचे हस्तक आहेत. त्याच्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, तर गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून राज्यातील प्रकल्प गुजरातला पाठवण्याचे काम शिंदे करत आहेत,

दरम्यान, विरोधकांकडून सरकारवर प्रकल्पावरून सातत्याने टीका करण्यात येत होती. या खोके सरकारवरून महत्त्वपूपर्ण क्षेत्रांचा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे. उद्योग (Industry) आणि शेती क्षेत्राचा सरकारवरचा विश्वास उडालेला आहे. महाराष्ट्रातील एक एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com