Nana Patole | Prakash Ambedkar
Nana Patole | Prakash AmbedkarTeam Lokshahi

प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्य सांगणारे झाले; नाना पटोले असे का म्हणाले?

वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केला होता. त्यावरच आज पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेला असताना काल पुण्यात माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला होता. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच गोंधळ निर्माण झाला होता. आता त्याच दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यशक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nana Patole | Prakash Ambedkar
अजित पवारांबाबत केलेल्या राणांच्या 'त्या' दाव्यावर मिटकरींचा पलटवार; म्हणाले, पाप...

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्य सांगणारे झाले, मला माहिती नाही, असा टोला त्यांना लगावला. तसेच आंबेडकरांनी राज्यात दोन राजकीय स्फोट होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हे स्फोट नेमके कुठं होतात, ते बघू, असा देखील टोमणा त्यांनी आंबेडकरांना लगावला.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

पंधरा दिवसांमध्ये बरचं मोठे राजकारण महाराष्ट्रात घडेल. त्यामुळे आपण पंधरा दिवसांची वाट पाहू. त्यामुळे पंधरा दिवस थांबा. त्यानंतर पत्रकारांकडून हा स्फोट कुठे होणार? त्यावर बोलताना ते म्हणाले की, राज्यात दोन ठिकाणी स्फोट होईल. हा स्फोट संपूर्ण देशात होईल. त्यामुळे मी एवढच सांगेल वाट पाहा. असा दावा त्यांनी केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com