सावरकरांच्या विधानावर राहुल गांधी ठाम! म्हणाले, हिंमत असेल तर...

सावरकरांच्या विधानावर राहुल गांधी ठाम! म्हणाले, हिंमत असेल तर...

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात मोठे वादंग उभे राहिले आहे. आज राहुल गांधींनी पत्रकार परिषदेद्वारे भूमिका मांडली.

अकोला : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात मोठे वादंग उभे राहिले आहे. अशातच शिंदे गटातील नेत्याने भारत जोडो यात्रा रोखावी, अशी मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. याचा समाचार आज राहुल गांधींनी पत्रकार परिषदेद्वारे घेतला आहे. यादरम्यान, राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम असून सावरकरांचे पत्रच दाखवले. तसेच, हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा रोखून दाखवाच, असे आव्हानही भाजपाला दिले आहे.

सावरकरांच्या विधानावर राहुल गांधी ठाम! म्हणाले, हिंमत असेल तर...
राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून मनसे आक्रमक; राज ठाकरेंचे आदेश, मनसैनिकांनो उद्या...

राहुल गांधी म्हणाले, माझ्याकडे ही कागदपत्रे आहेत. सावरकरांचे इंग्रजांना लिहिलेले ही पत्रे आहेत. यात सर, मैं आपका नोकर रहना चाहता हूँ. हे मी म्हटलं नाही. तर सावरकर यांनी म्हटलंय. फडणवीसांना वाचायचं असेल तर त्यांनी हे पत्रं वाचावं. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती, असे पुन्हा एकदा म्हंटले आहे.

माझा फोकस भारत जोडो यात्रेवर आहे. या यात्रेला अजून दोन तीन महिने लागणार आहेत. लोकांचं प्रेम मिळत आहे. लोकांकडून शिकायला मिळत आहे, असं राहुल गांधी म्हणाले. आमचं काम भारत जोडायचा आहे. हे आम्हाला करायचं आहे. आम्ही इतर गोष्टींचा विचार करत नाही. आमची यात्रा रोखायची असेल तर रोखा. काहीच अडचण नाही. कुणाचा काही विचार असेल तर तो मांडला पाहिजे. सरकारला वाटलं ही यात्रा रोखली पाहिजे तर त्यांनी रोखण्याचा प्रयत्न करावा, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.

सावरकरांच्या विधानावर राहुल गांधी ठाम! म्हणाले, हिंमत असेल तर...
राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याशी सहमत नाही; उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

ते पुढे म्हणाले, या लढाईला अगोदर समजून घ्यावे लागेल. लोकशाहीत एक पक्ष दुसऱ्या पक्षाशी लढत असतो. या युद्धात देशातील इतर संस्था पारदर्शकता निर्माण करतात. मात्र आता भाजपाचे माध्यमांवर नियंत्रण आहे. वेगवेगळ्या संस्थावरही भाजपाचे नियंत्रण आहे. ते न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकतात. आम्ही माध्यमांसमोर, संसदेत आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त काँग्रेसच नव्हे तर इतर विरोधी पक्षांनीदेखील तो प्रयत्न केला. मात्र आमच्याकडे कोणताही अन्य उपाय शिल्लक न राहिल्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

मला देशात सध्या दोन मुख्य समस्या दिसत आहेत. पहिली समस्या म्हणजे सध्या युवकांना रोजगार मिळेल याचा विश्वास नाही. युवकांनी कोठेही शिक्षण घेतलेले असले, तरी त्यांना रोजगार मिळेलच याची शाश्वती नाही. दुसरी समस्या शेतकऱ्यांबद्दल आहे. शेतकरी देशाला अन्न पुरवतो. मात्र त्याला सध्या कोणताही अधार नाहीये. त्याच्या शेतमालाला भाव नाहीये. शेतकरी पीकविमा भरतो. मात्र त्याला पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांचे कर्जदेखील माफ होताना दिसत नाही, असा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

तसेच, राहुल गांधी यांनी आमदारांना ऑफर केलेल्या पैशांवरही गौप्यस्फोट केला आहे. मला आता शिवसेनेचे एक आमदार भेटले. ते सांगत होते की, भाजप आणि शिंदे गटाने आमदारांना कसं फोडलं ते. 50 कोटी रुपये देऊन आमदारांना फोडल्यांचं त्यांनी सांगितलं. त्या आमदारालाही 50 कोटीची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ती नाकारली. ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले, असे राहुल गांधींनी सांगितले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com