Nana Patole | Bhagatsingh Koshyari
Nana Patole | Bhagatsingh KoshyariTeam Lokshahi

राज्यपालांवर नाना पटोलेंची बोचरी टीका; राज्यातील हा कचरा...

महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या दैवतांचा धडधडीत अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी?

राज्यात सध्या राजकीय मंडळींकडून एका पाठोपाठ वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यात एकच त्या विधानावर टीका केली जात आहे. त्यानंतर काल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज्यांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली होती. त्यानंतर त्यावरच एकच राजकीय वर्तुळात खळबळ माजली. अनेक राजकीय मंडळींची यावर प्रतिक्रिया येत असताना. त्यावरूनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर बोचरी टीका केली आहे.

Nana Patole | Bhagatsingh Koshyari
भाजप प्रवक्त्यावर खासदार कोल्हे संतापले; म्हणाले, 'आता खूप झालं बोलायची वेळ आली'

काय म्हणाले पटोले?

राज्यपालांच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपाच्या प्रवक्तेन्या अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा थेट इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपाल कोश्यारींची जीभ कशी झडली नाही? त्यांच्या अशा विधानातून आरएसएसची मानसिकता दिसून येते. महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या दैवतांचा धडधडीत अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी? निवडणुकीत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसून वारंवार त्यांचाच अपमान करता, ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आहे. असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

Nana Patole | Bhagatsingh Koshyari
राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य; अजित पवारांची प्रतिक्रिया, वेळ आलीयं पंतप्रधानांनी गंभीर...

काय म्हणाले होते राज्यपाल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com