Congress Protest | महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन; नाना पटोलेंसह नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न

Congress Protest | महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन; नाना पटोलेंसह नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न

देशभरात सध्या काँग्रेसचं जोरदार आंदोलन सुरू आहे. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी याच्या विरोधात तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्याच्या विरोधात ही निदर्शनं होतायत.
Published by :
Team Lokshahi

देशभरात सध्या काँग्रेसचं जोरदार आंदोलन सुरू आहे. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी याच्या विरोधात तसंच सोनिया गांधी (sonia gandhi) आणि राहुल गांधी (rahul gandhi) यांची ईडी चौकशी या सगळ्याच्या विरोधात ही निदर्शनं होतायत. दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावरही राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याशिवाय ईडी कारवाईवरूनही आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. दरम्यान, मुंबईतही काँग्रेसची निदर्शनं सुरू आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहेत.

Congress Protest | महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन; नाना पटोलेंसह नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न
Accident | खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकचा मोठा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात कॉंग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होत हे आंदोलन केलं आहे. सातारा रोडवर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्या होत्या. महागाई विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं. तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतलं हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू केली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम तसंच माणिकराव ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Congress Protest | महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन; नाना पटोलेंसह नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न
Sandeep Naik | "वाढदिवसाला हार तुरे नको फक्त वृक्ष रोपणसाठी एक झाड द्या"

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यासह काँग्रेस नेते आंदोलनात सहभागी होत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा राज्यात १६ दिवसांचा दौरा होतोय. सात लोकसभा मतदारसंघ व १५ विधानसभा मतदारसंघातून ते पदयात्रा काढणार असून त्या माध्यमातून ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com