नागपूरमधील अंभोरा ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे वर्चस्व; रामेश्वर बावनकुळेंचा पराभव

नागपूरमधील अंभोरा ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे वर्चस्व; रामेश्वर बावनकुळेंचा पराभव

ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे.

कल्पना नालस्कर | नागपूर : नागपूरमधील मजमोजणीस सुरुवात झाली आहे. याचे निकाल आता समोर येत असून अंभोरा ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. काँग्रेस समर्थित राजू कुकडे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहे. तर, भाजप-समर्थित उमेदवार रामेश्वर बावनकुळे यांचा पराभव झाला आहे.

जिल्ह्यातील 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी 81.24 टक्के मतदान झाले. या निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु आहे. यानुसार पहिलाच निकाल समोर येत असून अंभोरा ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. काँग्रेस समर्थित राजू कुकडे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहे. तर, भाजप-समर्थित उमेदवार रामेश्वर बावनकुळे यांचा पराभव झाला आहे. तर, 17 पैकी रामटेक तालुक्यातील पुसदा पुनर्वसन क्रमांक 1 आणि पुसदा पुनर्वसन क्रमांक 2 या पुनर्वसित गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे तिथे मतदान झाले नाही.

दरम्यान, राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com